skip to main |
skip to sidebar
इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणार्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशा-परदेशातून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिवल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.
1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
2. तांबडी जोगेश्वरी
3. गुरूजी तालीम
4. तुळशीबाग
5. केसरी वाडा (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलीली मूर्ती विसर्जित करून उत्सव मूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.
Copyright ©
My Pune. All Rights Reserved.
0 comments:
Post a Comment